LIVE STREAM

Crime NewsLatest News

अब वही होगा, जो दिल चाहेगा! पुण्यात तरुणाला मारहाण करुन संपवलं, बॉडीचा व्हिडिओ इन्स्टावर, टोळीची दहशत

आदित्या भवार, पुणे : पुण्यातील संघटित गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. सध्या पुण्यात गुन्हेगारीचं भयावह वास्तव पाहायला मिळत आहे. येरवड्यातील RS कंपनी टोळीने एका तरुणाचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ चित्रित करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. मारहाण करताना संबंधित तरुणाला “कुत्रा” असे संबोधण्यात आले. “दुश्मन टोळीसोबत का फिरतोस?” असा आरोप करत आरोपींनी त्याला निर्दयपणे मारहाण केली.

या घटनेमुळे संबंधित तरुण प्रचंड भयभीत झाला असून त्याच्या कुटुंबीयांनी काही काळासाठी त्याला नातेवाईकांच्या घरी ठेवले आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

अपहरण आणि मारहाणीची घटना

अनसफ हसनेन अश्रफ असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून, २७ जानेवारी रोजी त्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपी विकी ऊर्फ विजय कंबळे, तुषार शेठे आणि शैलेश ससाणे यांना अटक केली आहे. या प्रकरणी तरुणाच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे.

RS टोळीचा दहशतवाद सुरूच

R S टोळीचा प्रमुख रोहित संखे आहे. वडगावशेरी, चंदननगर आणि येरवडा परिसरात या टोळीची दहशत आहे. काही महिन्यांपूर्वी संखेनं राठोड नावाच्या तरुणाचा खून केला होता, त्यामुळे तो सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. मात्र, त्याच्या टोळीचे सदस्य अद्याप बाहेर असून परिसरात दहशत माजवत आहेत.

मृत तरुणासोबत फिरत असल्याच्या संशयावरून टोळीतील सदस्यांनी अनसफ हसनेन अश्रफ याला लक्ष्य केले. तो वडगावशेरीतील गणपती विसर्जन घाटावर बसलेला असताना आरोपी विकी ऊर्फ विजय कंबळे, तुषार शेठे यांनी त्याला पकडले आणि बेदम मारहाण केली. शैलेश ससाणे याने या मारहाणीचा व्हिडिओ चित्रित करून इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड केला. यापूर्वी देखील या टोळीने खून करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यामुळे या गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसल्याचे स्पष्ट होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!