नांदेडमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांना आमदार करण्याची मागणी – वाढदिवसानिमित्त महिला मोर्चाची विशेष मागणी!

नांदेड :- नांदेड जिल्ह्यात भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी एकत्र आले. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने ‘भावी आमदार’ म्हणून केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना विधान परिषदेत आमदार करण्याची जोरदार मागणी केली.
भोकर मतदारसंघाच्या आमदार जयताई चव्हाण आणि हदगाव मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांनीही किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाची स्तुती केली आणि त्यांच्या विधान परिषद आमदारकीला पाठिंबा दर्शवला. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे अधिकृत मागणी केली आहे की, किशोर देशमुख यांना विधान परिषदेत संधी द्यावी.
महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, किशोर देशमुख हे नांदेड जिल्ह्यातील गोरगरीब जनतेसाठी सतत झटत आहेत. जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते अहोरात्र कार्यरत असतात, त्यामुळेच त्यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. युवा मोर्चाच्याही वतीने हीच मागणी करण्यात आली असून, किशोर देशमुख यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई बंडाळे आणि भाजप पदाधिकारी सागर सरपाते यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आणि किशोर देशमुख यांना विधान परिषदेत संधी देण्याची विनंती केली.