“आई रमाई यांच्या जयंती निमित्त इर्विन परिसरात भव्य महोत्सवाचे आयोजन”

अमरावती :- 7 फेब्रुवारी, ही तारीख भारतभर आदर आणि श्रद्धेने साजरी केली जाते. आई रमाई यांचा जन्मोत्सव आज संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. आज आम्ही एक खास कार्यक्रमाचा रिपोर्ट घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये रमाई फायर संघटना आणि जीवन विकास फौंडेशन यांनी इर्विन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात महोत्सवाचे आयोजन केले. चला तर मग, या उत्सवाची सविस्तर माहिती जाणून घेऊ.”
“आई रमाई यांनी महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शेवट पर्यंत साथ दिली, ज्यामुळे बाबासाहेबांच्या कार्याला यश मिळाले. त्यांच्या जयंती निमित्त रमाई फायर संघटना आणि जीवन विकास फौंडेशन यांनी इर्विन परिसरात महोत्सवाचे आयोजन केले. यामध्ये थायलँड येथून पवित्र अस्थी आणण्यात आल्या, आणि त्या अस्थीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित झाले.
कार्यक्रमात एक रात्र निळ्या पाखराची बहार देखील साजरी करण्यात आली. या खास कार्यक्रमात माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, समाजभूषण उत्तमराव गवई, सिटी न्यूज चॅनलचे उपसंपादक अजय शृंगारे, आक्रमण संघटनेचे अध्यक्ष ऍड. सुनील गजभिये, प्रा. बनसोड यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजेंद्र वाटाने, विनोद गुलदेवकर, शुभम मेश्राम, स्वराज वासनकर, सूरज दांडगे आणि स्नेहल जवंजाळ यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याचबरोबर पत्रकार बांधवांचा सन्मान देखील करण्यात आला.”
आई रमाई यांच्या जयंतीसाठी आयोजित केलेल्या या उत्सवामुळे समाजातील सर्व स्तरांमध्ये एकजुटीचा संदेश पोहोचला आहे. आगामी अपडेटसाठी आमच्याशी जुळून राहा आणि बघत राहा सिटी न्यूज.”