वेलकम पॉईंटवर खाजगी बस्सेसचा अनधिकृत थांबा – नियोजनाचा अभाव, प्रवाशांचे हाल आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

अमरावती :- वेलकम पॉईंटवर खाजगी बसेसच्या थांबण्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. वेलकम पॉईंटवर पीकअप पॉईंट असावा का? तसेच, रस्त्यावर मनमानीने पार्किंग केलेल्या बसेसची समस्या समोर आली आहे. यातून इतर वाहनचालकांना होणाऱ्या समस्यांचा उलगडा झाला आहे. यावर सखोल तपास करण्यात आले आहे.”
वेलकम पॉईंटवर पीक अप पॉईंट आहे का? हा प्रश्न उपस्थित करताच, याबाबत वाहनचालक व प्रवाश्यांच्या अनेक समस्यांची उकल झाली आहे. वेलकम पॉईंट येथे असलेल्या खाजगी बसेसच्या पार्किंगमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे, सकाळ आणि सायंकाळी लांब पल्ल्याच्या खाजगी बसेस रस्त्यावरच पार्किंग करतात, ज्यामुळे इतर वाहनचालकांना मोठा त्रास होतो.
तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडीएम सी रुग्णालय जवळील खाजगी बसेस ला हद्दपार करून त्यावेळेस वेलकम पॉईंट जवळ दिला होता पीकप पॉईंट
वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांनी याबाबत सिटी न्यूजला सांगितले की, “वेलकम पॉईंटवर खाजगी बसेसला पीक अप पॉईंट आहे, कारण ती येथे तात्पुरते परवानगी मिळालेली आहे.” पाहूया काय म्हटले वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांनी—–
१५ वर्षांपासून या मुद्द्यावर कोणताही बदल झाला नसल्याचे वाहतूक विभागाने मान्य केले आहे. पोलिस चौकींची दुरवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे फक्त शोपीस ठरणे आणि सार्वजनिक शौचालयाची कमतरता यांसारख्या समस्यांनी परिसरातील परिस्थिती आणखी गंभीर बनवली आहे.
सिटी न्यूजच्या टीमने गुरुवारी सायंकाळी वेलकम पॉईंटवर थांबलेल्या अनेक खाजगी बसेसचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यामध्ये अनेक बसेस रस्त्यावर पार्किंग करताना दिसत आहेत, आणि रस्त्यालाही अरुंद करत आहेत. पोलीस चौकी असूनही परिस्थितीतील सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वेलकम पॉईंटवरील शौचालय बांधकाम ठेवले गेले असले तरी ते रखडले आहे. यामुळे महिलांना शौचालयाची सुविधा न मिळणे आणि बसण्याची व्यवस्था नसणे यासारख्या समस्या देखील गंभीर बनल्या आहेत.
यावर सिटी न्यूजचे पुढील पाऊल, प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून वेलकम पॉईंटवरील खाजगी बसेसच्या पार्किंग व्यवस्थेची स्पष्टता मागवणे आहे. तसेच, पोलिस आयुक्त रेड्डी यांना इतर येजा करणाऱ्या वाहनचालकांना होणाऱ्या अडचणींबाबत विचारले जाईल.
वेलकम पॉईंटवरील समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील, अशी आशा असली तरी स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या अजूनही कायम आहेत.
“आता, या प्रश्नावर प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिस प्रशासनाशी सखोल चर्चा केली जाणार आहे. वेलकम पॉईंटवरील पीकअप पॉईंटची स्थिती, पार्किंगच्या समस्या, तसेच सार्वजनिक सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. सिटी न्यूजकडून आपण या मुद्द्यांवर अधिक अपडेट देत राहू. धन्यवाद.”