LIVE STREAM

Latest News

दिल्ली निवडणुकीत भाजपाची मुसंडी, आपचा दारून पराभव

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 विधानसभा जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते. दिल्ली निवडणुकांसह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. प्रत्येक महत्वाचे अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

अण्णा फॅक्टर चालला

समाजसेवक अण्णा हजारे यांनी 15-18 वर्षांपूर्वी दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीत मोठे आंदोलन उभारले होते. त्यातून देशात सत्ता पालट झाली. काँग्रेस सत्तेतून गेली. भाजपाने मांड ठोकली. दिल्लीच्या निवडणूक प्रचारात यावेळी अण्णा उतरले. केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावरच त्यांनी बोट ठेवलं. केजरीवाल स्वार्थी, बदमाश आणि संधीसाधू असल्याची प्रतिमा ठसवण्यात अण्णा यशस्वी ठरले.

भाजपाच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची चर्चा

दिल्लीत भाजपाने जोरदार मुसंडी मारल्यानंतर या विजयाचे श्रेय कुणाला द्यायचे याची चर्चा होत आहे. पक्षातील नेते त्यांच्या आवडीचा नेता मुख्यमंत्री पदी असावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत.

संयम बाळगा-आतिषी

भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी यांनी कार्यकर्त्यांना थोडासा संयम बाळगा असे आवाहन केले आहे.

दिल्लीत भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात

दिल्लीत भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. सध्याच्या कलानुसार भाजपाने 42 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आप 28 जागांवर पुढे आहे. काँग्रेसच्या खात्यात एकही मत गेलेले नाही.

हा तर महाराष्ट्र पॅटर्न, दिल्ली निवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

दिल्लीत आप सत्तेतून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. जनता भाजपाला मतदान करत नसल्याचे ते म्हणाले. मतदान घोटाळ्याचा महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत राबवल्याचा आरोप त्यांनी केला.

बिहारच्या निवडणुकीवर परिणाम

दिल्लीत डबल इंजिन सरकार अस्तित्वात येत आहे. सर्व काही फुकट देऊन विजय मिळवता येतो, या विचाराला मतदारांनी चोख उत्तर दिल्याचे सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले. दिल्लीतील निकालाचे सकारात्मक परिणाम बिहारच्या निवडणुकीवर दिसतील असे ते म्हणाले.

दिल्लीकरांचा कौल कुणाला?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत २७ वर्षानंतर दिल्लीत कमळ फुलणार असल्याचे कलावरून स्पष्ट होत आहे. आम आदमी पक्षाला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

और लढो आपस में, ओमर अब्दुलांची पोस्ट और लढो आपस में, ओमर अब्दुलांची पोस्ट सध्या तुफान चर्चेत… ओमर अब्दुलांचा काँग्रेस आणि आपला टोला… दिल्ली आपच्या हातून गेली?, इंडिया आघाडीत बिघाडी…

27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं निवडणूक आयोगाच्या आकडेवाडीनुसार भाजप 24 आणि आप 6 जागांवर पुढे… 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं… मोदींच्या उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदा भाजपकडे…

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला दिल्लीत बहुमत मिळताना दिसत आहे. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांची संपूर्ण टीम कोलमडली आहे. ती पिछाडीवर आहे. तसेच काँग्रेसची कामगिरी पुन्हा निराशाजनक दिसत असून अवघ्या एका जागेवर आघाडीवर आहे.

भाजपमध्ये कांटे की टक्कर, केजरीवाल, आतिशी आणि सिसोदिया पिछाडीवर

दिल्लीत पोस्टल मतांची मोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप आणि भाजप यांच्यात कांटे की टक्कर दिसून येत आहे. मात्र, काँग्रेसचे खाते अद्याप उघडले नाही. जंगपुरा मतदारसंघातून आपचे उमेदवार मनीष सिसोदिया पिछाडीवर असून तसेच नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल आणि कालकाजी मधून आतिषी या पिछाडीवर आहेत.

पोस्टल मतमोजणीला सुरूवात, कोण आघाडीवर ?

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिला कल हाती आला आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये बुरारी आणि देवालीमध्ये ‘आप’ पुढे आहे, तर पडपडगंजमध्ये भाजप आघाडीवर आहे.

दिल्लीत पुन्हा कमळ फुलणार, भाजप उमेदवाराला विश्वास

“जसा देश विकसित भारत बनत आहे, त्याचप्रमाणे दिल्लीतही कमळ फुलणार आहे. आपची हॅटट्रिक होणार नाही. ” असे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते आणि मालवीय नगरचे उमेदवार सतीश उपाध्याय म्हणाले

भाजपने 68 जागांवर लढवली निवडणूक

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. या निकालाच्या ट्रेंडवरून, पुढील पाच वर्षे कोणाची सत्ता राहणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. आप आणि काँग्रेसने सर्व 70 मतदारसंघात उमेदवार उभे केले, तर भाजपने 68 जागा लढवल्या आणि जनता दल (युनायटेड) आणि लोकतांत्रिक जनशक्ती पार्टी (रामविलास) या मित्रपक्षांसाठी दोन जागा सोडल्या.

एकूण 699 उमेदवारांनी ही निवडणूक लढवली ज्यात 603 पुरुष, 95 महिला आणि थर्ड जेंडर मेदवार आहे. 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीत एकूण 60.5% मतदान झालं.

दिल्लीत भाजप विरुद्ध आप, 8 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी

दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणूक लढतीचा निकाल काही तासांतच लागणार आहे. 1998 पासून विरोधी पक्ष असलेल्या सत्ताधारी आप आणि भाजप यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे, परंतु काँग्रेसही काही अनपेक्षित निकालांसह ही लढत बदलू शकते. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल आणि 9.30 पर्यंत सुरुवातीचा कल येणं अपेक्षित आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. निवडणूक निकालापूर्वी भाजप आणि आप या दोन्ही पक्षांनी दिल्लीत विजयाचा दावा केला आहे. 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 विधानसभा जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते. 2020 च्या तुलनेत यावेळी दिल्लीत 2 टक्के कमी मतदान झाले आहे. निवडणुकीत 60.92 टक्के महिलांनी मतदान केले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपचे सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर ते सत्तेवर परतले तर 27 वर्षांनी भगवा पक्ष सरकार स्थापन करेल मात्र AAP विजयी झाल्यास दिल्लीत चौथ्यांदा सरकार स्थापन होईल. निवडणूक निकालाशी संबंधित प्रत्येक अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचण्यास मिळतील. लेटेस्ट अपडेटसाठी वाचत रहा हा ब्लॉग.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!