अमरावतीमध्ये हार्ट सर्जरी झालेल्या महिलेसोबत अश्लील वर्तन, आरोपीला अटक!

अमरावतीतील बिच्चू टेकडी भागातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एकाने हार्ट ऑपरेशन झालेल्या महिलेसोबत घरी जाऊन अश्लील वर्तन केल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून
७ फेब्रुवारी २०२५ रोजी अमरावतीतील बिच्चू टेकडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. हार्ट ऑपरेशन झालेल्या पीडित महिलेसोबत एकाने घरात घुसून अश्लील वर्तन केले. घरात शिरलेल्या आरोपीने महिलेसोबत प्रथम आरोग्याच्या बाबतीत विचारणा केली, पण अचानक त्याचे वर्तन बदलले. आराम करत असलेल्या महिलेसोबत आरोपीने अचानक अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी घरामध्ये असलेल्या पीडित महिलेच्या मुलीने प्रसंग पाहून आरोपीला हटकले आणि आरोपीला धमकी दिली. मुलीच्या कणखर विरोधामुळे आरोपी घाबरून पळाला. नंतर महिलेनं फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. फ्रेजरपूर पोलिसांनी त्वरित आरोपीविरुद्ध कलम ७५ (१)(i) , (२) ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. नागरिक आणि महिलावादी संस्थांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.