नागपूर पोलिसांनी केले बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका निर्दयी नराधमाने महिलेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला! पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक आणि अमानुष घटना घडली आहे. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली.प्राथमिक माहितीप्रमाणे, हुडकेश्वर पोलिसांना एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला याला अकस्मात मृत्यू मानण्यात आले, मात्र पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक सत्य समोर आले – महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती!
पोस्टमार्टम अहवाल मिळताच, हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तातडीने तपास सुरू करण्यात आला.तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. अखेर, हुडकेश्वर पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला शोधून अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, खून आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
“हुडकेश्वर परिसरातील या अत्याचाराच्या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी नागरिकांची मागणी आहे