शेतकऱ्यांचे आक्रोश – सरकार डोळ्यावर हिरोती ठेवून बळीराजाला करतंय भोकन

अमरावती :- बळीराजाच्या प्रश्नांकडे सरकार डोळेझाक करत असल्याचे संतप्त आरोप शेतकऱ्यांकडून होत आहेत. ‘कास्तकाराला लुटा आणि पुण्याला दान करा’ हीच सरकारची भूमिका असल्याचे अनेक संतप्त शेतकरी म्हणत आहेत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या धान्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे, मात्र शेतमालाच्या भावाने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
तूर, हरभऱ्याला योग्य दर नाही – शेतकरी संतप्तशेतकऱ्यांनी कष्टाने उगवलेला तूर, हरभरा आणि सोयाबीन बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे, पण योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मागील वर्षी १२ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळणाऱ्या तुरीचा भाव यंदा केवळ ७,५०० रुपयांवर आला आहे. हा मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नाफेडच्या खरेदीची प्रतीक्षा – पण शेतकऱ्यांना नाही फायदा!
अमरावती सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीच्या वतीने ३ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला सुरुवात झाली असली तरी, नाफेडची प्रक्रिया केवळ नोंदणीपुरती मर्यादित राहिली आहे. अंमलबजावणीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होताना दिसत नाही. सरकारच्या लबाड योजनांमुळे शेतकऱ्यांना लुटले जात असल्याचा आरोप संतप्त बळीराजाने केला आहे.
वाहनाचा खर्चही निघत नाही – शेतकरी आक्रोशितशेतमाल शेतातून बाजारात आणण्यासाठीच मोठा खर्च येतो. वाहन भाडे, मजुरी, बाजारातील इतर खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरी काहीच उरत नाही. व्यापाऱ्यांनी संगनमत करून दर पाडल्याचा आरोप होत असून, सरकारही डोळेझाक करत असल्याचे बोलले जात आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष – शेतकऱ्यांचा मोठा जनआंदोलनाचा इशाराबळीराजाला न्याय मिळावा यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा मोठे जनआंदोलन उभे राहील, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. शेतकऱ्यांचा हा आक्रोश सरकारला हादरवणारा ठरेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.