नांदेडमध्ये गोळीबाराची थरारक घटना – शहर हादरलं, आरोपी अजूनही मोकाट!

नांदेड :- नांदेडमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार! कायदा-सुव्यवस्थेचा चक्काचूर! गुरुद्वारा परिसरात झालेल्या या धक्कादायक गोळीबाराने शहर हादरलं आहे. दोन जण गंभीर जखमी, आरोपी अद्यापही मोकाट फिरतायत! कायदा फक्त कागदावर आहे का? नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय!
नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात आज सकाळी गोळीबाराची घटना घडली. एका खून प्रकरणातील आरोपी जो २२ जानेवारीपासून पॅरोलवर बाहेर आला होता, त्याच्यावर आणि त्याच्या मित्रावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. या थरारक घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, हा गोळीबार नेमका कशामुळे झाला? किती आरोपी होते? याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी लवकरच तपास होईल असे सांगितले आहे.
शहरात दिवसाढवळ्या गोळीबार होतोय आणि प्रशासन केवळ आश्वासन देतंय! कायदा-सुव्यवस्थेचा खेळखंडोबा झालाय. गुन्हेगारांना मोकाट सोडणाऱ्या यंत्रणेला आता जबाबदार धरलं पाहिजे! सरकार आणि प्रशासन कितीही गप्प बसलं तरी आता जनता शांत बसणार नाही! कायदा सुव्यवस्था टिकवायची असेल, तर त्वरित कठोर कारवाई करावी लागेल! अन्यथा नांदेडमध्ये गुन्हेगारीच्या विरोधात मोठा लढा उभारला जाईल!