“वालकटं कंपाउंड परिसरातील नालीच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त, 20 वर्षांचा प्रशासनाचा दुर्लक्ष”

अमरावती :- अमरावती शहर अस्वच्छेत बाजी मारणार असे चित्र दिसत आहे। कागदो पत्री स्वछता पुरस्कार मिळवणारी अमरावती महानगर पालिकाचे स्वच्छता विभागाची हलगर्जीपणामुळे नियमित साफ सफाई होत नाही हे सत्य आहे वालकटं कंपाउंड परिसरातील नाली समस्यांमुळे 20 वर्षांपासून नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रास सहन केला आहे. परिसरातील दुर्गंधी आणि सांडपाणी पसरलेले असताना, स्थानिक नागरिक स्वतःच्या खर्चाने नाली साफ करत आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.”
वालकटं कंपाउंड परिसरात एक चोक झालेली नाली अनेक नागरिकांसाठी मोठा त्रास बनली आहे. घरामागील सर्विस गल्लीतील सांडपाणी पसरत असून, दुर्गंधीने परिसरातील जीवन अत्यंत असह्य झालं आहे. 20 वर्षांपासून मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांनी स्वतः पैसे खर्च करून नाली स्वच्छता सुरू ठेवली आहे, मात्र प्रशासनाचे लक्ष अजूनही या समस्येकडे वळलेले नाही.”
“शेवटच्या चेंबर काढण्यासाठी मनपा प्रशासनाचा विलंब आणि कचऱ्यामुळे परिसरातील घाणीचे साम्राज्य वाढत आहे. व्यापारी दुकानदारांना देखील नालीच्या चेंबरच्या समस्या आहेत, तरी त्याची देखील दुरुस्ती होण्यास विलंब होत आहे.”
परिसरातील गौरी शंकर हेडा. डॉ श्रीकांत राठी, अशोक अग्रवाल , दिनेश छुटलानी यांचे सनराईज हॉटेल, सत्यनारायण अग्रवाल यांचे निवास स्थान असून कमालीचे झाले त्रास सहन करावे लागत आहे
या समस्यांच्या बाबतीत मनपा प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे, नाही तर या त्रासामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल. वाचता येईल अशी काळजी घेत प्रशासनाला यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.