AmravatiLatest NewsSports
विभागीय क्रीडा स्पर्धेत अमरावती जिल्हा सलग तिसऱ्यांदा विजेता
अमरावती, दि. 10 :- अमरावती जिल्ह्याने विभागीय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. अकोला येथे 7 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान झालेल्या स्पर्धेत विभागातील पाचही जिल्ह्यांनी सहभाग घेतला.
जिल्ह्याच्या कामगिरीत जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधीक्षक निलेश खटके आणि तहसीलदार विजय लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धेसाठी मुन्ना उर्फ महेंद्रसिंग ठाकूर, रामानंद सरस्वती, सुजित सरोदे, सागर बनसोडे, विवेक आकोलकर, दिनेश गवई, दीपक शिरसाट, वर्षा राठोड, सुनिता तिरमारे, रुपाली आंबेकर, माधुरी सगणे यांनी पुढाकार घेतला.