AmravatiLatest News
कृषिज्ञान, खवय्यांसाठी अस्सल वैदर्भीय खानावळींचे स्टॉल्स, विविध खाद्य पदार्थांची रेलचेल, बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मैफल

अमरावती शहरात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत दि. 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान सायन्सस्कोर मैदानावर कृषी विकास परिषद व प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. आत्माच्या वतीने पाच दिवसीय कृषी प्रदर्शनात कृषिज्ञान, खवय्यांसाठी विविध खाद्य पदार्थांची रेलचेल, बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. यात कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही मिळणार आहे.
सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत कृषीविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मिर्झा एक्सप्रेस, सुर नवा ध्यास नवा, हास्याचे तिखे बोल या कार्यक्रमांचे विशेष आकर्षण आहे. या प्रदर्शनीत धान्य, खाद्य, सेंद्रिय शेतमाल, शासकीय योजनांच्या माहितीसाठी स्टॉल्स राहणार आहेत. तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानासाठी कृषीला लागणाऱ्या मशिनरी आणि अवजारांचे प्रदर्शन राहणार आहे. सेंद्रीय शेतमालाची विक्रीशिवाय निविष्ठा कंपन्यांचा सहभागही राहणार आहे.
प्रदर्शनी दरम्यान दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मिर्झा एक्सप्रेस फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा विनोदी कार्यक्रम, दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता कलर्स मराठी टीव्ही फेम साहिल पांढरे यांचा सुर नवा ध्यास नवा, चला हवा येऊ द्या फेम प्रविण तिखे यांचा हास्याचे तिखे बोल हे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. प्रदर्शनीत 200 स्टॉल्स राहणार आहेत. यातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनीच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य पथक तैनात राहणार आहे.
कृषी प्रदर्शनीचे आयोजन मोठ्या स्वरूपात करण्यात आले आहे. सर्वांनी कुटुंबियांसह आवर्जून भेट द्या. विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी याठिकाणी शाळांच्या सहली देखील येणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांचा उद्योजकीय विकास घडवून आणणे, त्यांना सातत्याने रोजगाराच्या संधी आणि बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची बाजारपेठेशी सांगड घालून देण्याचे काम प्रदर्शनीच्या माध्यामातून करण्यात येणार आहे. जिल्हा कृषी प्रदर्शनामध्ये स्वयंसहायता महिला बचत गटांचे स्टॉल्स लागणार आहेत. विविध हस्तकलेच्या वस्तू तसेच तयार खाद्य पदार्थ, धान्य यांचे स्टॉल्स तसेच नित्योपयोगी वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. येथे अस्सल वैदर्भीय खानावळीचे स्टॉल्स लागणार आहेत. बचतगटातील महिलांना, शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी कृषी प्रदर्शनीला आवर्जून भेट द्यावी.