शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाला यश

“शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी प्रश्नांवर दोन्ही तासांच्या मॅरॅथॉन बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले गेले, ज्यात सोयाबीन, तूर, कापूस या पिकांसाठी योग्य भाव मिळविणे, कर्ज माफी, आणि शेतकऱ्यांच्या विविध अडचणींचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी, ६ फेब्रुवारी रोजी, शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी प्रश्नांवर आक्रमक आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर सोयाबीन आणि तूर फेकण्यात आली आणि जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालण्यात आला. यावर जिल्हाधिकारी यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांना बैठक बोलावून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आमंत्रण दिले. बैठकीत, पराग गुडधे यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज प्रलंबित कर्ज माफीच्या मुद्द्यावर प्रशासनाची ठणकावून चौकशी केली. तसेच, २०१५ ते २०१७ दरम्यान पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफीबाबत जाब विचारला आणि फळगळ अनुदान, तुरीच्या वाढीव अनुदानाच्या वितरणाची मागणी केली. बैठकीत विविध शेतकरी संदर्भातील मुद्दे उपस्थित करण्यात आले. जिल्हाप्रमुख पराग गुडधे, आमदार गजानन लवटे, जिल्हाप्रमुख मनोज कडू आणि अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे त्वरित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याची मागणी केली आहे.”