LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

आगीचे लोट आणि कानठळ्या, ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, १५० दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आज मंगळवारी (११ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास या फर्निचर मार्केट आणि लाकडी गोदामाला भीषण आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील रिलीफ रोडवर असलेल्या घास कंपाऊंडमध्ये सकाळी साडे ११ च्या सुमारास ही आग लागली.

ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये आग, आकाशात धुराचे लोट

 अंधेरी पश्चिमेतील असलेल्या ओशिवरा येथे एक मोठं फर्निचर मार्केट आहे. येथे फर्निचरची मोठ मोठी दुकानं आणि लाकडी गोडाऊन देखील आहे. या फर्निचर मार्केटमध्ये ही आग लागली आहे. लाडकाचं गोडाऊन आणि फर्निचरचं सामान असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात आणि वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, आगीने सध्या रौद्र रुप घेतलं असून आगीचा मोठा भडका दिसून येत आहे. तर आकाशात दूरवर धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल, १५० हून अधिक दुकानांमध्ये आग पसरल्याची माहिती

जवळपास १२ अग्निशमन दलाच्या गाड्या, सहा जंबो टँकर, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग १५० हून अधिक लाकडी फर्निचरच्या दुकानांमध्ये पसरली आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग फर्निचर मार्केटमध्येच लागली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.सिलेंडर ब्लास्टमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. लाकडी गोडाऊन आणि फर्निचर मार्केट असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे आणि ती वाढत चालली असल्याची माहिती आहे. दुकानं जळून खाक होत आहे. आतापर्यंत सात ते आठ सिलेंडर ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!