“यशोधरा नगर पोलिसांनी ४ लाख ९८०७ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू मुद्देमाल जप्त केला!”

नागपूर :- एक नजर नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे, या प्रकरणाचा पूढील तपास यशोधरा नगर पोलिस करीत आहेत.
“यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विटापट्टी चौक येथे सुनील भिमटे (वय 52) याने प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याचा व्यवसाय सुरू केला होता. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची योजना आखली. पोलिसांच्या सापळ्यामुळे आरोपी सुनील भिमटेवर छापेमारी करण्यात आली आणि त्याच्या ताब्यातून एकूण 4 लाख 9,807 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी सुनील भिमटे प्रतिबंधित पदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाल्यावर यशोधरा नगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल हा तंबाखू आणि पान मसाल्याचा प्रतिबंधित प्रकार असून, तो सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. यशोधरा नगर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असून, पोलीस पुढील तपास सुरू करीत आहेत
हे होते नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस विभागाच्या मोठ्या कारवाईचे अपडेट. प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याच्या विक्रीवर सखोल तपास आणि कडक कारवाई सुरू आहे, आणखी माहितीसाठी आणि नवीन अपडेट्ससाठी बघत रहा सिटी न्यूज.