अयोध्या श्रीराम मंदिराचे मुख्य महंत सत्येंद्रदास महाराज अनंतात विलीन

मोठी आणि दुःखद बातमी! अयोध्या श्रीराम मंदिराचे मुख्य महंत, ३८ वर्षांपासून मंदिराची सेवा करणारे परमपूज्य सत्येंद्रदास महाराज अनंतात विलीन झाले आहेत. संपूर्ण हिंदू समाजासाठी आणि रामभक्तांसाठी ही अत्यंत वेदनादायक बातमी आहे. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक जगतावर शोककळा पसरली आहे. “
“परमपूज्य सत्येंद्रदास महाराज, जे ३८ वर्षांपासून अयोध्या श्रीराम मंदिराच्या सेवेवर होते, त्यांनी केवळ मंदिराच्याच नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजाच्या धार्मिक भावना जागृत ठेवल्या. काही महिन्यांपूर्वीच ते अमरावतीच्या हनुमान गढी येथे आले होते, जिथे त्यांनी श्रीरामभक्तांना आशीर्वाद दिला होता. त्यांच्या अकस्मात जाण्याने हिंदू समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अयोध्या, अमरावती आणि संपूर्ण देशभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.”
“महंत सत्येंद्रदास महाराज यांचे निधन हे हिंदू धर्मासाठी मोठे नुकसान आहे. त्यांच्या योगदानाची आठवण सदैव भक्तांच्या मनात राहील. त्यांच्या आत्म्यास श्रीरामचरणी शांती लाभो, हीच प्रार्थना! पुढील अपडेट्ससाठी बने रहा Siti News सोबत… जय श्रीराम!