ऑटो चालकाने बांधकामाचे लोखंडी साहित्य लंपास केले, गाडगे नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नागपुर :- नागपुरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच गाडगे नगर पोलिसांनी एका शिताफीने चोरी करणाऱ्या ऑटो चालकाला अटक केली आहे. या चोरट्याने बांधकामाचे लोखंडी साहित्य आणि अन्य मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांनी शक्कल लढवून त्याला जेरबंद केले आहे. संपूर्ण तपशील जाणून घेऊया आमच्या या खास रिपोर्टमध्ये.
१२ फेब्रुवारी रोजी गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीतील गजानन धाम येथे बांधकाम ठेकेदार अमोल अरुण नांदुरकर यांचे काम सुरू होते. परंतु अचानकच त्यांच्या बांधकाम स्थळी ठेवलेले ८ हजार रुपये किमतीचे १२ तराफे आणि १,५०० रुपये किमतीच्या लोखंडी सळाख्या असा एकूण ९,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. एवढेच नव्हे, तर चोरीसाठी वापरण्यात आलेला १ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऑटोही या गुन्ह्यात सामील असल्याचे समोर आले.फिर्यादीच्या तक्रारीनंतर गाडगे नगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. डीबी पथकाने एका ऑटो चालकावर संशय घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने चोरीची कबुली दिली.
गुलजार मस्जिदजवळ राहणारा २२ वर्षीय मोहंमद मोईन मोहंमद मोहसीन हा चोरीच्या घटनेचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्याला गाडगे नगर पोलिसांनी तात्काळ अटक केली आणि त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार आणि गाडगे नगर पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार मानकर, पोलीस उपनिरीक्षक आरती गवई, तसेच पोलीस कर्मचारी जावेद अहमद, राजुआप्पा बाहेकर, अनुप झगडे, बंडू खडसे, अभिजित गावंडे, निलेश सिसोदे, मनीष कळंबे, योगेश यादव, सुनील बाजगिरे आणि रियाज खान यांनी मोलाची भूमिका बजावली.या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बांधकाम साइटवर योग्य सुरक्षेची व्यवस्था करावी, आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.
गाडगे नगर परिसरात चोरीची घटना घडली आणि पोलिसांनी अवघ्या काही तासांत कसा चोराला जेरबंद केले. पोलिसांची ही जलद कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे, मात्र नागरीकांनीही आपली सावधानता राखली पाहिजे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज.