विद्यापीठाच्या हिवाळी-2024 लेखी परीक्षेच्या पर्यायी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित पाचही जिल्ह्रांच्या महाविद्यालयांमधील क्रीडा, सांस्कृतिक, आविष्कार, आव्हान, उत्कर्ष इत्यादी स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या व विद्यापीठाच्या संबंधित अधिका-यांनी प्रमाणित केलेल्या विद्याथ्र्यांच्या विद्यापीठीय पर्यायी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत असून वेळापत्रकानुसार दि. 1 मार्च, 2025 पासून पुढे दिलेल्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.
अमरावती जिल्ह्रातील विद्याथ्र्यांची परीक्षा विद्याभारती महाविद्यालय, अमरावती (126), अकोला जिल्ह्रातील विद्याथ्र्यांची श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (205), बुलडाणा जिल्ह्रातील जी.एस. महाविद्यालय, खामगांव (301), यवतमाळ जिल्ह्रातील अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ (401), वाशिम जिल्ह्रातील आर.ए. महाविद्यालय, वाशिम (701) तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरीता विद्याथ्र्यांच्या हिवाळी-2024 परीक्षेच्या प्रवेश पत्रावर नमूद केलेले परीक्षा केंद्र राहतील. सदर विद्याथ्र्यांचे हिवाळी-2024 परीक्षेकरीता देण्यात आलेले परीक्षा क्रमांक व प्रवेश पत्र पर्यायी परीक्षेकरीता कायम राहतील. तसेच वेळापत्रक व परीक्षा केंद्रनिहाय रोललिस्ट विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.