अमरावतीच्या कॉटन मार्केटमध्ये भीषण आग!

अमरावती :- अमरावतीच्या कॉटन मार्केटमधून, जिथे आज दुपारी 3 वाजता लागलेल्या भीषण आगीने 4 दुकाने जळून खाक झाली आहेत. लाखोंचा माल भस्मसात झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मागील १० दिवसात ही तीसरी मोठी आग आहे चला, पाहूया हा संपूर्ण अहवाल.”
अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये ही आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, एका दुकानात वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागली, ज्यामुळे आगीने शेजारच्या दुकानांनाही वेढले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि 2 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
या आगीत शंकर रामभाऊ खारकर (दुकान क्रमांक 13), शेख अकबर शेख हैदर (दुकान क्रमांक 14), आणि गजानन देविदास लकडे (दुकान क्रमांक 12) या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
बाजार समितीमध्ये अग्निशमन यंत्रणांचा अभाव असल्याने व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या बेजबाबदार कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी हटवण्याचे प्रयत्न केले, तर वाहतूक पोलिसांनी परिसरात वाहतुकीचं नियमन केलं.आगीच्या या घटनेनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोरे यांनी समितीच्या वतीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
“ही घटना दाखवते की शहरातील बाजारपेठांमध्ये सुरक्षेची किती कमतरता आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशा घटना घडत असतील, तर पुढे काय? व्यापाऱ्यांच्या नुकसानीवर प्रशासन काय मदत करणार? आणि महत्त्वाचं म्हणजे, अशा दुर्घटना टाळण्यासाठी बाजार समिती आणि प्रशासन कोणती पावलं उचलणार? महानगर पालिका तर्फे होणाऱ्या फायर ऑडिटवर मोठा प्रश्न चिन्ह लागला आहे या सर्व घडामोडींवर आम्ही सिटी न्यूजमध्ये सतत लक्ष ठेवून राहू. पाहत राहा सिटी न्यूज!”