नागपूर पोलिसांची मोठी कारवाई: गांजा विक्री करणारा रित्विक उर्फ सोमेश पराते रंगेहाथ अटक

नागपूर :- एक नजर नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर शहरातील लकडगंज विभागात गांजा विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, एसीपी श्वेता खाडे यांच्या नेतृत्वाखाली पाचपावली पोलीस स्टेशनने कोंबिंग ऑपरेशन राबवले, ज्यात एक गांजा विक्रेता रंगेहाथ पकडला गेला.
नागपूर शहर पोलिसाच्या लकडगंज विभागात गांजा विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी एक विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनच्या दरम्यान नंदगिरी रोडवर रित्विक उर्फ सोमेश विलास पराते नावाचा युवक गांजा विक्री करत असताना आढळला. त्याच्याकडे दोन ग्राहक होते, जे पोलिसांना बघून पळून गेले, पण रित्विकला पोलिसांनी पकडले. त्याची झडती घेतल्यावर, त्याच्या खिशातून आणि बॅगमधून 88 ग्राम गांजा सापडला. त्याच्या विरोधात आधीपासूनच पोलिस स्टेशन मध्ये विविध गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्या दुचाकीसह गांजा जप्त केला आहे. आरोपीचे आपराधिक इतिहास लक्षात घेता, पोलिसांची यावरून अधिक तपास सुरू आहे.
हे ऑपरेशन शहरातील पोलीस विभागाच्या कडक कारवाईचे उदाहरण आहे. पुढील तपास आणि अधिक माहिती पोलीस तपासानंतर दिली जाईल. अशीच आणखी महत्त्वाची आणि ताजी माहितीठी बघत रहा सिटी न्यूज