Crime NewsLatest NewsNagpur
नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, कोंबिंग ऑपरेशनमध्ये हत्यार आणि गांजा जप्त!

नागपूर :- एक नजर नागपूरच्या क्राइम जगतावर, नागपूर शहर पोलिस आयुक्त यांनी सर्व झोन प्रमुखांना कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिलेत, सर्व झोन प्रमुखांनी तात्परतेनी या आदेशाचे पालन करीत त्यांच्या हद्दीतील सर्व पोलिस स्टेशन मध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालून रेकॉर्डवरील जवळपास 15 आरोपीच्या घरांची झडती घेतली गेली. यामध्ये दोन आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवून, पुढील तपास सुरू केला आहे.
तर, हे होते नागपूर शहरातील कोंबिंग ऑपरेशनचे अपडेट. दोन्ही आरोपींवर कारवाई केली जात असून पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. पुढील काही दिवसांमध्ये या तपासाची अजून माहिती मिळण्याची शक्यता आहे.
आणखी अपडेट्ससाठी बघत रहा सिटी न्यूज