रोकडे ज्वेलर्सच्या भव्य प्रदर्शनाला शानदार सुरुवात

अमरावती :- नागपूरच्या प्रसिद्ध रोकडे ज्वेलर्सच्या भव्य प्रदर्शनाला आज अमरावतीत शानदार सुरुवात झाली आहे. ग्रँड महफिल येथे तीन दिवस चालणाऱ्या या ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार राजेश वानखडे आणि क्रेडाई अमरावतीचे अध्यक्ष निलेश ठाकरे यांच्या हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आले. सोबतच नामिका रोकडे यांनी मान्यवरांना सन्मानचिन्ह देत या सोहळ्यात रंगत आणली.
अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात नागपूरच्या नामांकित रोकडे ज्वेलर्सने सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर २५ टक्के तर डायमंड ज्वेलरीवर १०० टक्के विशेष सवलत दिली आहे. या भव्य सोहळ्यात डॉक्टर जागृती शहा आणि संगीता ठाकरे यांनीही सहभाग घेतला आणि रोकडे ज्वेलर्सच्या गुणवत्तेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रदर्शनाला अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन मान्यवरांनी केले आहे.
आमदार राजेश वानखडे यांनी अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी दिली असून, लवकरच अमरावतीतही रोकडे ज्वेलर्सची एक ब्रँच सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यामुळे स्थानिक ग्राहकांना नागपूरपर्यंत प्रवास करण्याची गरज लागणार नाही.”
तर अमरावतीकरांसाठी ही एक खास संधी असून, या प्रदर्शनात विविध आकर्षक ऑफर्स आणि दर्जेदार ज्वेलरी उपलब्ध आहे. ग्रँड महफिल येथे सुरू असलेल्या या भव्य प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा CITY NEWS