14 फेब्रुवारीचा तो काळा दिवस…; पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला कसा झाला?

आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. 14 फेब्रुवारी 2019 हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक मानला जातो. या दिवशी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवानांनी आपले प्राण गमावले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर हा हल्ला झाला होता.
अवंतीपोरा येथील गोरीपोरा परिसरात ताफ्यासोबत जाणाऱ्या एका संशयास्पद वाहनाने एका बसला जोरदार धडक दिली आणि तात्काळ स्फोट घडवून आणला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या वीर शहिदांच्या बलिदानाने देशवासीयांना सुरक्षा आणि एकतेच्या दिशेने अधिक जागरूक केले आहे. आजचा दिवस त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्याचा आहे.
अवंतीपोरा येथील गोरीपोरा परिसरात श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दहशतवाद्यांनी सीआरपीएफ ताफ्यावर भयंकर हल्ला केला. ६० हून अधिक लष्करी वाहनांमध्ये २५४७ सैनिक प्रवास करत होते. एका स्फोटकांनी भरलेल्या कारने लष्करी बसेसना धडक दिली, ज्यामुळे जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला, आणि परिसर आग व धुराने व्यापला. या भयानक हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले.
जैश-ए-मोहम्मद
अवंतीपोरा येथे झालेल्या भयंकर हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. या स्फोटाने अनेक लष्करी बसेसचा नाश केला आणि ४० जवान शहीद झाले. स्फोटाच्या तीव्रतेने संपूर्ण देश हादरला, भारतीयांच्या मनाला मोठा धक्का बसला. या क्रूर कृत्याने देशभर शोककळा पसरली, आणि लोकांच्या नजरा आता दहशतवादाविरोधातील कठोर कारवाईकडे लागल्या होत्या.
सर्जिकल स्ट्राईक
पुलवामा हल्ल्यानंतर फक्त १२ दिवसांनी, २५ फेब्रुवारीच्या रात्री भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केली. या कारवाईत भारतीय हवाई दलाने २ हजार विमानांच्या मदतीने सुमारे १ हजार किलो बॉम्ब टाकले आणि ३०० पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवादी छावण्यांवर झालेल्या या हल्ल्याने पाकिस्तानला अचंबित केले. या प्रभावी कारवाईला बालाकोट एअर स्ट्राईक असे नाव देण्यात आले होते.