LIVE STREAM

Crime NewsIndia NewsLatest News

“न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील मॅनेजरचा घोटाळा; 122 कोटी रुपये लंपास”

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं केलेल्या कारवाईनंतर अनेक खातेधारकांनी बँकेबाहेर रांगा लावत आपल्या ठेवींची विचारणा केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं खातेधारक आणि ठेवीदारांचा हिरमोड झाला आणि ते कोलमडले. इथं ही स्थिती असतानाच आता या बँकेसंदर्भातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

NICB चा Former General Manager and Accounts head हितेश मेहता विरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे तब्बल 122 कोटी रुपये रकमेचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माजी महाव्यवस्थापकाने बँकेची तिजोरी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकाने बँकेच्या तिजोरीतून 122 कोटी रुपये काढून घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे.

हितेश प्रवीणचंद मेहता असे आरोपीचे नाव आहे. हितेश बँकेच्या महाव्यवस्थापकपदी असताना दादर आणि गोरेगाव शाखेची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्यावेळी पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यातून 122 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं.

बँकेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दादर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात हितेश आणि आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. पुढील तपासासाठी प्रकरण ईओडब्ल्यूकडे वर्ग करण्यात आलं आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँकेविरोधात कारवाई केली. मुंबईस्थित या बँकेमध्ये जवळपास 1.3 लाख ठेवीदारांच्या ठेवी असून, साधारण 90 टक्क्यांहून अधिक खातेधारकांच्या खात्यांमध्ये 5 लाखांहून अधिक रक्कम ठेव स्वरुपात ठेवण्यात आली होती. बँकेतील काही खात्यांची तपासणी केली असता अपेक्षित तपशील हाती न आल्यानं आरबीआयनं या बँकेवर कारवाई केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!