LIVE STREAM

Helth CareLatest NewsMaharashtra

सांगलीत खळबळ, जीबीएसमुळे १४ वर्षांच्या मुलासह २ जणांचा मृत्यू

सांगली :- सांगलीमध्ये जीबीएस आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जीबीएस लागण झालेल्या दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मिरजेत मृत्यू झालेल्यात हुक्केरी (जि. बेळगाव) येथील १४ वर्षीय मुलाचा आणि सांगोला (जि. सोलापूर) येथील ६० वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर,सोलापूर, नागपूरनंतर आता सांगलीमध्येही जीबीएसमुळे मृताची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण मृताची संख्या ११ वर पोहचली आहे.

सांगलीच्या मिरजमधील शासकीय रुग्णालयात गेल्या १५ दिवसांत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील १५ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी ६ रुग्ण बरे झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. सध्या ७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रुग्ण पुण्याला, तर एक कराडला उपचारासाठी गेला आहे. १५ रुग्णांमध्ये सांगली शहरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. शहरात चिंतामणीनगर, विश्रामबाग आणि संजयनगरमध्ये ‘जीबीएस’चे रुग्ण आढळले होते.

कर्नाटकातील हुक्केरी येथील १४ वर्षांच्या तरुणाला ‘जीबीएस’ची लागण झाली होती. त्याला ३१ जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती. ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती. तिचा मध्यरात्री मृत्यू झाला. नागरिकांनी घाबरू नये. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात. लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी केले आहे.

पंढरपुरात दोन जीबीएस रूग्ण

माघी यात्रेनंतर पंढरपुरात जीबीएसचे दोन रूग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दोन्ही संशयित रूग्ण पंढरपूर शहरातील असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जीबीएसचे रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने पंढरपूर शहरात पाहणी सर्वे सुरू केला आहे. सर्वे मध्ये शहरातील 30 हजार कुटुंबातील नागरिकांच्या आरोग्याची माहिती गोळा करण्यात आली आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे शहरातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश सुडके यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!