करियर कौन्सिलिंग सेल मार्फत व्याख्यान संपन्न

विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे करिअर कौन्सिलिंग अँड गाईडन्स मार्फत प्रा. डॉ. पी. पी. ठाकूर यांचे करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आली होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन करियर कौन्सिलिंगचे समन्वयक डॉ. एच. डी अकोटकर यांनी केले. व्याख्याते प्रा. डॉ. पी. पी. ठाकूर विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, भाषेच्याद्वारे अनेक संधी रोजगाराच्या उपलब्ध आहेत. भाषा हे रोजगार मिळवून देण्याचं प्रभावी साधन आहे म्हणून विद्यार्थ्यांनी भाषेवर प्रभुत्व मिळवले पाहिजे. इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषा प्रत्येकाला आल्याच पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात जा भाषे शिवाय कोणतेही कार्य होत नाही. कार्पोरेट जगात अनेक क्षेत्र आहेत जिथे भाषेच्या विद्यार्थ्यांना संधी आहेत. जाहिरात लेखन असेल, इतिवृत्त लेखन, मालिका, कथा, नाटक, मुद्रितशोधक, बातमी कार निवेदक संपादक अशा विविध क्षेत्रात भाषेचे विद्यार्थी काम करू शकता असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., एम.ए., एम.एस.सी., चे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. संदीप शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. टकले, प्रा. व्हि. यु. मोरे, प्रा. डॉ. शेखर खडसे, प्रा. बानाईत, प्रा. खंदारे, प्रा. गवई, प्रा. भूतेकर, आधी महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.