शेतकऱ्यांचा तिवसा तहसीलवर तुफान एल्गार – सरकारविरोधात संतप्त घोषणाबाजी

तिवसा :- शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव मिळावा, शासकीय खरेदी सुरू करावी आणि तूर- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात तिवसा तहसीलवर शेतकऱ्यांनी तुफान मोर्चा काढला! बाजारात पिकांचे दर कोसळलेत, शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबाला कवडीमोल भाव मिळतोय, व्यापारी मनमानी करतायत आणि सरकार शांत बसलंय! अखेर संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत सरकारला हादरवून सोडलं! चला पाहुया या प्रचंड आक्रोशाचा अहवाल!
विदर्भातील शेतकरी आज आक्रोशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत! तिवसामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला!
तूर, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी कंगाल! व्यापाऱ्यांची लूट सुरू, सरकार बघ्याची भूमिका घेतंय!
नाफेड खरेदी बंद! शेतमाल पडून शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान!
सीसीआय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी – सरकार किती दिवस दुर्लक्ष करणार?
नुकसानग्रस्त संत्रा-मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन!
सरकार शेतकऱ्यांशी दगाफटका करतंय का? हमीभाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर आले, पण कोण ऐकणार?
शेतकरी ओरडून सांगतायत की, शेतमालासाठी योग्य दर नाही, व्यापारी वाटेल तशा किंमतीत लूटत आहेत, सरकार मात्र सुस्त झोपेत आहे! शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे!
या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष जसबिर ठाकूर, सरपंच सुरज धमनखेडे, उपसरपंच प्रशांत प्रधान यांसह अनेक नेते आणि शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.