कत्तलीसाठी अवैध गोवंश वाहतूक! – पोलिसांची मोठी कारवाई, ६० जनावरांची सुटका, ४ ठार

नागपूर :- नागपूरमध्ये गोवंश तस्करांचा थरार! पोलिसांनी मोठी कारवाई करत ६० जनावरांना क्रूरतेच्या चंगळातून मुक्त केलं, तर ४ बिचारी जनावरं तिथंच जीव सोडून गेली! मध्य प्रदेशातून हैदराबादला जाणारा हा तस्करीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे! ड्रायव्हरला अटक झाली असली तरी या गोरक्षकांची लक्तरं फाडणाऱ्या मोठ्या मास्टरमाइंडला पकडणं अजून बाकीच आहे!”
“आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया, कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून नेण्यात आलेल्या गोवंश तस्करीचा संपूर्ण थरारक तपशील! पाहत राहा… सिटी न्यूज!”
६० बिचाऱ्या गोवंश जनावरांना निर्दयीपणे एकमेकांवर फेकून क्रूरतेने भरून नेणाऱ्या या ट्रकचा पोलिसांनी आज अखेर पर्दाफाश केला!
पांजरी टोल नाका येथे सापळा रचत पोलिसांनी आरोपीला गजाआड केले!
मध्य प्रदेशातील कटनी येथून आलेला ‘मृत्यूचा ट्रक’ – १४ चाक्यांचा हा ट्रक जबलपूर हायवेने हैदराबादकडे निघाला होता!
गुप्त माहितीच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी सर्जिकल स्ट्राइकसारखी धडक कारवाई केली!
MH 18/BA/9543 या क्रमांकाचा अशोक लीलँड ट्रक मध्य प्रदेशातून हैदराबादला कत्तलीसाठी निघाला होता.
ट्रक चालक असलम खान हकीम खान (रा. शिहोर, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले!
चार बिचाऱ्या गोवंश जनावरांनी अत्याचार सहन न करता गुदमरून मृत्यू पत्करला!
६० जनावरांना अक्षरशः एकमेकांवर फेकून तोंड, पाय, शिंग क्रूरतेने बांधून निर्दय वाहतूक सुरू होती!
पोलिसांनी ट्रक मालक व इतर आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. हा प्रकार स्थानिक गोमांस तस्करांच्या मोठ्या नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संपूर्ण ६० जनावरांना बीडगाव, नागपूर येथील गोवंश शाळेत हलवण्यात आले!
आता तेथे पशुवैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांना योग्य आरोग्यसेवा दिली जात आहे.
पोलीस ठाणे बेलतरोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली
API रामेश्वर कांडुरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोरडे , पोलीस हवालदार अंकुश चौधरी, DB पथकाचे अजय नेवारे, सुहास शिंगणे, विवेक श्रीपाद, सुमेन्द्र बोपचे, योगेश प्रमोद यांनी या मोठ्या कारवाईत निर्णायक भूमिका बजावली!
“हे बघा, कायदा सर्वांसाठी समान असतो! पण आजही असे कसाई प्रवृत्तीचे तस्कर गोवंश जनावरांवर अमानुष अत्याचार करत आहेत! हा अवैध धंदा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस सतर्क आहेत, पण अजूनही मोठे मास्टरमाइंड मोकाट फिरत आहेत!”
“हेच चित्र पाहता प्रश्न एकच – अवैध गोवंश वाहतूक करणारे कधी आटोक्यात येणार? मोठे मास्टरमाइंड कधी अडकणार? आणि या बिचाऱ्या मुक्या जनावरांचा नरसंहार कधी थांबणार?”
“आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू! सत्य समोर आणत राहू! पाहत राहा सिटी न्यूज – निर्भीड, बेलगाम आणि खरे!”