जुन्या वादातून वचपा काढला! रात्री तरुणाला रस्त्यात गाठलं, ४ जणांनी सपासप वार करून संपवलं

जालना :- तरुणाच्या हत्येने जालना हादरले आहे. जालन्याच्या अंबड शहरात जुन्या वादातून तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या पण इतर 3 आरोपी फरार आहेत. या तिन्ही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. जुन्या वादातून हे हत्याकांड झाल्याची माहिती समोर आली आहे. या हत्येच्या घटनेनं अंबड शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जालन्याच्या अंबड शहरात जुन्या वादातून तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्या. अंबड शहरातील पठाण मोहल्ला भागात राहणाऱ्या कलीम शेख खाजा शेख (वय ३० वर्षे) या तरुणाची जुन्या वादातून चाकूने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कलीम शेखला पठाण मोहल्ल्यात गाठून ४ जणांनी त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कलीमचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेनं अंबड शहरात एकच खळबळ उडाली असून मयत कलीम शेख याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तर फरार असलेल्या ३ आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.