गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शन व पादुका सोहळा

अमरावती :- आज देवरनकर नगर येथे सुरू असलेल्या श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवाची सुरुवात मोठ्या भक्तिभावाने झाली आहे. यामध्ये भक्तांसाठी शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिराचा प्रतिकृती देखावा तसेच पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. चला, पाहूया या भक्तिमय सोहळ्याचा सविस्तर रिपोर्ट!
देवरनकर नगरमध्ये श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रगट दिन महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
श्री साईबाबा समाधी मंदिराचा हुबेहूब देखावा येथे उभारण्यात आला असून, 16 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथील निमोण गावातील 125 वर्षे जुना पादुका दर्शन सोहळा भक्तांसाठी खुला राहणार आहे.
यासोबतच 20 फेब्रुवारी रोजी गजानन महाराजांचा 147 वा प्रगट दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे.
भक्तांसाठी ह.भ.प. श्रीहरी महाराज सोनेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेचे शुभम शेगोकार यांनी सर्व भक्तांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त अमरावतीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. साईबाबा समाधी मंदिराचा देखावा, पादुका दर्शन सोहळा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांचे आवाहन आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा