यवतमाळच्या मारेगावात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के, अधिकृत दुजोरा नाही!

यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची चर्चा सुरू आहे. काल मध्यरात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास कुंभा, गौराळा, किन्हाळा आणि तिसगाव या गावात लोकांना भूकंपाच्या लहरी जाणवल्या. मात्र, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संपूर्ण वृत्त पाहूया.
काल मध्यरात्री 10:30 च्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील कुंभा, गौराळा, किन्हाळा आणि तिसगाव येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण असून, काही लोक घराबाहेर पडले होते. घटनेची माहिती मिळताच मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी कुंभा व तिसगाव या गावांना भेट दिली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी झटके जाणवल्याचे सांगितले असले तरी, अधिकृत प्रशासनाकडून भूकंपाच्या या धक्क्यांचा कोणताही दुजोरा मिळालेला नाही. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.
बाईट :-
उत्तम निलावाड, तहसीलदार, मारेगाव
ग्रामस्थांनी आम्हाला सांगितले की, रात्री काही सेकंदांसाठी हलकासा धक्का जाणवला. मात्र, अधिकृत भूकंप मापन प्रणालीकडून याला दुजोरा मिळालेला नाही. प्रशासनाकडून तपास सुरू आहे.
मारेगाव तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची चर्चा आहे, मात्र प्रशासनाकडून याला दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे ही अफवा आहे की खरोखर भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे.