सलग दुसऱ्या दिवशीही कृषि प्रदर्शनीला शेतकरी व नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती :- अमरावती येथील सांयन्सकोर मैदान येथे सुरु असलेल्या जिल्हास्तरीय कृषि विकास परिषद व प्रदर्शनीला सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी व नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे
दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना,आरोग्याच्या दृष्टीने पोष्टिक तृणधान्याचे महत्व, संरक्षीत शेती तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्तेचा(AI) कृषि क्षेत्रात वापर व उपयोग,पोष्टिक तृणधान्याचे महत्व व लागवड पद्धती, आरोग्य दायी जिवन शैली या विविध विषयावर परीसंवादाने झाली.सांयकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात मिर्झा एक्स्प्रेस या कार्यक्रमाला अमरावती करांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
या प्रदर्शनीला सलग दुसऱ्या दिवशी विविध स्टाॅलला ५२०० शेतकऱ्यांनी व नागरीकानी भेट देऊन विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली तसेच खरेदी केली.
प्रदर्शनीचे ठिकाणी उभारण्यात आलेल्या २८८ स्टाॅलचे माध्यमातून १५ लाखांची उलाढाल झाली असे कृषि विभागाकडून सांगण्यात आले.यामध्ये विविध धान्ये, मसाले,भाजीपाला,गृहोपयोगी वस्तू,शोभीवंत फुलांची झाडे,कृषि निविष्ठा,सिंचन साधने, मशिनरी,औजारे असे विविध स्टाॅल आहेत,त्यात धनलक्ष्मी महीला बचत गट व महात्मा ज्योतिबा फुले महिला बचत गट या दोन स्टाॅलवर रोडगे,झुणका भाकर या पदार्थांची चव चाखण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली .
नैसर्गिक शेती हि काळाची गरज आहे हे ओळखून पी.आर.पोटे पाटील कृषि महाविद्यालय,अमरावतीचे विद्यार्थ्यांनी नैसर्गिक शेतीबद्दल पथनाट्यचे माध्यमातून सादरीकरण करून जनजागृती केली.
विशेष म्हणजे या कृषि प्रदर्शनीला मेळघाटचे आमदार केवलराम काळे,अमरावती मतदार संघाच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी आवर्जून उपस्थित राहून विविध स्टाॅलला भेट दिली या प्रदर्शनीमुळे खर्या अर्थांने शेतकरी ते ग्राहक संकल्पना प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे.