सक्करदारा मध्ये कुख्यात कार्तिक चौबेची हत्या

नागपुर :- नागपुरातील सक्करदारा परिसरात एका खळबळजनक घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. कुख्यात गुन्हेगार कार्तिक चौबेची चाकूने हत्या करण्यात आली असून, या प्रकरणी आरोपी रोशन गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. बीती रात शाहू गार्डन भागात ही घटना घडली. आम्ही पाहूया या संपूर्ण घटनेचा तपशीलवार रिपोर्ट!
गुन्हेगारी विश्वात कुख्यात असलेला कार्तिक चौबे (28) तीन महिन्यांपूर्वीच एका हत्येच्या गुन्ह्यातून सुटला होता. मात्र, तो आपले गुन्हेगारी वर्तुळ सोडण्यास तयार नव्हता.बीती रात्री कार्तिक आणि त्याचे काही साथीदार शाहू गार्डन येथे मद्यपान करत होते. त्याचवेळी रोशन गायकवाड या तरुणासोबत त्याचे काही कारणावरून वाद झाले. वाद वाढत गेला आणि कार्तिकने रोशनच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
कार्तिकचा हल्ला सहन न करता रोशनने त्वरित आपल्या खिशातून धारदार चिनी चाकू काढला आणि कार्तिकच्या छातीत तुफान वार केले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, हल्ल्याची तीव्रता इतकी जास्त होती की कार्तिकने घटनास्थळीच जीव गमावला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रोशन गायकवाडला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.
कार्तिक चौबे हा गुन्हेगारी जगतात आधीपासूनच परिचित होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते आणि तीन महिन्यांपूर्वीच एका हत्येच्या आरोपातून तो सुटला होता.
मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्याने आपली गुन्हेगारी सवय सोडली नाही.या घटनेमुळे सक्करदारा परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला असून, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.