नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने इमामवाडा झोनमध्ये व्यसनविरोधी खेळ स्पर्धा

नागपूर :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने इमामवाडा झोनमध्ये से नो टू ड्रग्स हा संदेश जनसामान्य आणि युवकांना देण्यासाठी खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धा पोलिस प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यात खेळण्यात आल्या.
नागपूर शहरामध्ये व्यसन आणि ड्रग्स विक्री यासारख्या घटनांना नियंत्रणात आणण्यासाठी, नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने एक अनोखा उपक्रम राबवला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली इमामवाडा झोनमध्ये पोलीस प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यात सामूहिक खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये झोनमधील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अंमलदार तसेच सामान्य नागरिक सहभागी झाले. ‘से नो टू ड्रग्स’ या संदेशाचे प्रसार करण्यासाठी आणि पोलिसांशी नागरिकांचे नाते दृढ करण्यासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेच्या विजेत्यांना भारताचे संविधान देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, झोन प्रमुख, संबंधित अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक या कार्यक्रमात उपस्थित होते. डीसीपी रश्मिका राव यांनी या टूर्नामेंट बाबत माहिती दिली आणि पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांची महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली.
या व्यसनविरोधी टूर्नामेंट केवळ एक खेळ नाही, तर एक महत्त्वाचा संदेश देणारा उपक्रम आहे. ‘से नो टू ड्रग्स’चा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस प्रशासनाची या उपक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. नागपूर शहरातील नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील एकात्मतेची ही एक सुंदर उदाहरण आहे. आशा आहे की, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे नागपूर शहरामध्ये व्यसनविरोधी जागरूकता वाढेल. आणखी अपडेट साठी बघत रहा सिटी न्यूज