वर्गमित्रांचा जाच असह्य, पुण्यात विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलतं आयुष्य संपवलं, फोनचा पासवर्ड लिहला अन्…, सत्य आलं समोर

पुणे :- पुण्यात एका महविद्यालयीन विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलत आपल आयुष्य संपवलं आहे. ताथवडे येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात तिच्या या निर्णयामागचं सत्य समोर आलं आहे. वर्गमित्राकडून सतत होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. सहिती कलुगोटाला रेड्डी (वय 20, रा. अक्षरा इलेमेंटा सोसायटी, ताथवडे) असं या विद्यार्थींनीचं नाव आहे. ती आकुर्डीतील एका महाविद्यालयाच इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. याप्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (वय 54) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव राजेंद्र डोंगरे (वय 20, रा. मयूर समृद्धी, आकुर्डी गावठाण) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये अनेक व्हॉइस मेसेज..
सहितीच्या आत्महत्ये मागील कारण समजू न शकल्याने सुरूवातीला पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तिने आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये अनेक व्हॉइस मेसेज करून ठेवले होते. तसेच काही रेकॉर्डिंग व पुरावे मित्रांना पाठवत स्वतःचा मोबाईल कुठे ठेवला आहे त्याचे ठिकाण, त्याचा पासवर्डही सांगितला होता. तिच्या मित्र-मैत्रिणींनी हा सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला असता, आत्महत्येमागील धक्कादायक सत्य समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी डोंगरे याच्यावर सहिती हीस शारीरिक, मानसिक त्रास देऊन, वारंवार शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सहिती रेड्डी असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. सहिती ही आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. या प्रकरणी पोलिसांनी प्रणव राजेंद्र डोंगरे याला अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुण्यातील ताथवडे या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (वय 54) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिली माहिती
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सहितीने आत्महत्या केली होती. त्यावेळी तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पोलिसांना पुरावा म्हणून सहिती हिने तिच्या मोबाईलमध्ये अनेक रेकॉर्डिंग आणि मेसेज पाठवले आहेत. याशिवाय तिने तिच्या काही जवळच्या मित्रांना देखील शेअर केले होते. त्यात तिने स्वतःचा मोबाईल कुठे ठेवला आहे आणि याचा पासवर्ड देखील सांगितला होता. यामुळे सर्व हकिकत समोर आली आहे.