आज ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा’चे आयोजन

अमरावती :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमितत बुध्वार, दि. 19 फेबुवारी रोजी ‘जय शिवाजी – जय भारत पदयात्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7.30 वाजता सायन्सस्कोर मैदान येथून पदयात्रेला सुरवात होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सकाळी 7.30 वाजता देशाला संबोधीत करतील. त्यानंतर सकाळी 8 वाजता पदयात्रेला सुरवात होणार आहे. पदयात्रा सायन्सस्कोर मैदान, शिव टेकडी, जिजाऊ पुतळा, बियाणी चौक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पंचवटी चौकमार्गे निघून विभागीय क्रिडा संकुल येथे समारोप होणार आहे.
पदयात्रेला सुरवात झाल्यानंतर शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर माँ जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा क्रिडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र, एनसीसी, एनएसएस यांच्यावतीने, तसेच विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. पदयात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.