छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य रॅली
अमरावती :- बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी,२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य रॅली सकाळी ७.०० वाजता सायंस्कोर मैदान येथे आयोजित करण्यात आली होती.
सायस्कोर मैदानातून रॅलीची सुरुवात होवून शिवटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला हार्रापण करुन आर.टी.ओ. ऑफीस जवळील जिजाऊ माता पुतळ्याला हार्रापण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ.अनिल बोंडे, पद्मश्री शंकर बाबा पापळकर, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
रॅलीच्या समारोपानंतर महानगरपालिका येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार्रापण मा.आयुक्त सचिन कलंत्रे भा.प्र.से. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, उपअभियंता प्रमोद इंगोले, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.