छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास पुढे आला पाहिजे – शिवश्री सुधीर थोरात
अमरावती :- छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास पुढे आला पाहिजे, त्यासाठी अभ्यास समित्या, प्राध्यापकवर्गांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पुणे येथील प्रसिध्द शिवव्याख्याते शिवश्री सुधीर थोरात यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत येणा-या एम.ए.छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत बीजभाषण करतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी तथा उद्घाटक म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, व्य.प. सदस्य डॉ. नितीन चांगोले, अधिसभा सदस्य प्रा.श्रीकांत काळीकर, आजीवन व अध्ययन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते.
श्री सुधीर थोरात पुढे म्हणाले, शिवपूर्व काळात अनेक आक्रमणे झालीत. अन्याय, अत्याचार, लुटमार, बंदी बनविणे, महिलांची परदेशात विक्री, आपल्याच देशात राहून जिजीया कर भरावा लागणे, एवढेच नव्हे, तर मृतदेहांचीही विटंबना केली जात होती. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मा झाला आणि छत्रपती शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ यांनी महाराजांना बालपणापासूनच सर्वप्रकारचे धडे दिले. बालपणी मिळालेल्या शिक्षणातून छत्रपती शिवाजी महाराज तरबेज झालेत आणि पुढे त्यांनी स्वत:चे आरमार, पायदळ, घौडदळ, गुप्तचर विभाग, संरक्षण विभाग, प्रधान अष्टमंडळ असे तयार करुन स्वराज्याची निर्मिती केली. लोककल्याणासाठी राज्यकारभार करावयाचा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव मानस होता व तो त्यांनी करुन दाखविला. महाराजांचे व्यवस्थापन अतुलनीय होते. तसेच त्यांचे उत्तम प्रशासन होते. मात्र महाराजांचा इतिहास इंग्रज काळात पुढे येऊ दिल्या गेला नाही. त्यामुळे महाराजांचा दैदीप्यमान इतिहास पुढे आला पाहिजे आणि त्यासाठी अभ्यास समित्या, प्राध्यापकवर्गांनी पुढाकार घेऊन विद्याथ्र्यांनीही महाराजांच्या विचाराची प्रेरणा घेऊन तो अंगिकारावा, असे आवाहन देखील शिवश्री सुधीर थोरात यांनी याप्रसंगी केले.
उद्घाटन झाल्याची घोषणा करुन डॉ. प्रवीण रघुवंशी म्हणाले, व्याख्यानमालेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे एकंदरीत व्यवस्थापन, त्यांचे कार्य विद्याथ्र्यांना कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाही पध्दतीनेच आपल्या राज्याचा कारभार केला. नौदलाची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज पहिजे राजे होत. ते लोककल्याणकारी राजेच नाही, तर उत्कृष्ट प्रशासकही होते. प्रा. श्रीकांत काळीकर म्हणाले, विद्यापीठ हे संस्कारपीठ आहे आणि दीपस्तंभाप्रमाणे विद्याथ्र्यांसाठी विचार प्रवाहीत होतात. व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्याथ्र्यांसाठी आयोजित केलेली परीक्षेची संकल्पना देखील उत्कृष्ट असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विद्याथ्र्यांनी अंगिकृत करावे, तीच त्यांना आदरांजली ठरेल – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, राजेमहाराजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या कारभाराचे सूक्ष्म नियोजन, दूरदृष्टी याची विद्याथ्र्यांनी प्रेरणा घ्यावी. सूरत लुटल्यानंतर महाराजांनी त्यांच्या गनिमी काव्याने मोघलांना कसे पराभूत केले, रायगडावरील हत्तींबाबत महाराजांची दूरदृष्टी कशी होती आणि यातून महाराजांचे सूक्ष्म नियोजन कसे होते हे दिसून येते. त्यामुळे विद्याथ्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकृत करावे आणि तीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे सांगून कार्यशाळेच्या माध्यमातून जी वातावरण निर्मिती झाली आणि विद्याथ्र्यांसाठी प्रश्नमंजुषेची मांडलेली संकल्पना याबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांची अभिनंदन केले.
संत गाडगे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी शिवश्री सुधीर थोरात यांचा सन्मानचिन्ह व रोपटे देऊन सत्कार केला. तसेच आजीवन अध्ययन विभागातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी मेघा ग्रेसपुंजे, नरेंद्र राऊत, सोनल साऊरकर, राहुल बरडे, प्रवीण पाचघरे, निखिल मोहोड यांचा कुलगुरूंच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून आयोजनामागील भूमिका डॉ. श्रीकांत पाटील यांनी मांडली.
अतिथींचा परिचर श्री भैय्यासाहेब चिखले यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा. देवानंद गावंडे यांनी, तर आभार प्रा. वृषाली जवंजाळ यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाला विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सी.ए. पुष्कर देशपांडे, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. नितीन कोळी, अधिसभा सदस्य डॉ. प्रशांत विघे, श्री सुनिल तिप्पट, श्री राजेश पांडे, ननसा संचालक डॉ. अजय लाड, संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, डॉ. महेंद्र मेटे, विद्यापीठाचे अधिकारी श्री मंगेश वरखेडे, श्री विक्रांत मालवीय, श्री शशिकांत रोडे, श्री अनिल घोम, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख तसेच विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.