जागतिक महिला दिनानिमित्त डॉ कमलताई गवई यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर अमरावतीच्या सहा महिलांना राष्ट्रीय नारी शक्ती सम्मान २०२५ घोषित

अमरावती :- जागतिक महिला दिनानिमित्त आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन नवी दिल्लीच्या वतीने ९ मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्या कार्याला प्रोत्साहान देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून अमरावतीकरासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे अमरावतीच्या माजी लेडी गव्हर्नर आचार्या डॉ कमलताई गवई यांना जीवन गौरव पुरस्कार तर प्रा.वर्षा देशमुख, कीर्ती अर्जुन, डॉ अरुणा वाडेकर,डॉ शोभा रोकडे, डॉ अंजली देशमुख, डॉ रोमा बजाज यांना जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२५ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या या सम्मान सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई राहाटकर या करणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार श्री रामदास आठवले, केन्द्रीय राज्यमंत्री ना मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार श्री बळवंत वानखडे, हे राहणार आहेत अमरावती हा महिला कर्तृत्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून अनेक नामवंत महिलांनी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केले आहे.त्यांचा रूपाने अमरावतीच्या मातीला विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.सामाजिक सांस्कृतिकशैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अमरावतीचे नाव त्यांच्यामुळे जागतिक स्तरावर गाजलेआहे ही अमरावतीची गौरवशाली परंपरा आहे आणि हा अमरावतीचा गौरव सुद्धा आहे. या शहराचा गौरवशाली इतिहास आहे. या शहरातुन अनेक मोठ मोठ्या महिलांनी आपल्या कार्य कार्य-कर्तुत्वाची सुरुवात केली आणि देशपातळीवर नावलौकिक प्राप्त केले.अमरावतीच्यामहिलांनी समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन व टीम झेनिथ इंटरनॅशनलच्यावतीने अमरावतीच्या महिलांचा दिल्लीत गौरव करण्यात येणार आहेत त्यांमधे माजी लेडी गव्हर्नर आचार्या डॉ कमलताई गवई यांना जीवन गौरव पुरस्कार तर शिक्षण क्षेत्र व सामाजिक क्षेत्रातील प्रा.वर्षा देशमुख, प्राचार्य श्री पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, कीर्ती अर्जुन अध्यक्ष दादासाहेब गवई चारीटेबल ट्रस्ट, डॉ अरुणा वाडेकर महिला महाविद्यालय ,डॉ शोभा रोकडे प्राचार्य कढी महाविद्यालाय अचलपूर , डॉ अंजली ठाकरे, मा प्राचार्य श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ रोमा बजाज यांना नारी शक्ती सम्मान यांना जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२५ देऊन गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वरूप शाल श्रीफळ, सन्मान पत्र, स्मृति चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.