जमिनीचा वाद जीवावर उठला, भावानेच भावावर झाडल्या धाड धाड गोळ्या; कल्याण हादरलं

कल्याण :- जमिनीच्या वादावरून चुलत भावाने गोळ्या झाडून दुसर्या भावाची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना कल्याण पुर्वेत घडली आहे. दोन चुलत भावांमध्ये उत्तर प्रदेश येथील जमिनीवरून वाद सुरू होता. याच वादातून चुलत भावाने नाना पावशे चौकात दुसर्या भावाची हत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
कल्याण पुर्वेतील नाना पावशे चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका चुलत भावाने आपल्याच दुसर्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. आधी त्यांच्यात जमिनीवरून वाद झाला. जमिनीचा वाद इतका विकोपाला गेला की एका चुलत भावाने दुसर्या चुलत भावावर गोळ्या झाडल्या. यात भावाचा जागीच मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात रणजित दुबे याचा मृत्यू झाला आहे. तर, गोळीबार करणारा आरोपी राम दुबे पसार झाला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकात रणजित दुबे आपल्या कुटुंबासह राहत होता. तसेच आरोपी राम दुबे देखील कल्याण पूर्वेत राहतोय. दुबे कुटुंबाची उत्तर प्रदेश येथे जमीन आहे. या जमिनीवरून रणजित दुबे आणि चुलत भाऊ राम दुबे यांच्यामध्ये वाद सुरू होता. अनेकदा जमिनीच्या वादावरून दोघांमध्ये भांडणं होत.
१९ फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास राम दुबे याने रणजीत दुबे याला नाना पावशे चौक परिसरात एकट्यात गाठलं. रणजित दुबे आणि राम दुबे यांच्यात पुन्हा जमिनीवरून वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, राम दुबेने बंदुक काढत रणजितवर गोळ्या झाडल्या.
या गोळीबारात रणजीत याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर रामदुबे हा पसार झाला आहे. या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत राम दुबेचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.