सागर व ओम जीरापुरे वार्षिक महोत्सवात सन्मानित

अमरावती :- श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत संस्थेचे प्रधानसचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व शालेय समिती अध्यक्षा डॉ. सौ. माधुरीताई चेंडके यांच्या मार्गदर्शनात शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार व समस्त कर्मचारी वृंद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शाळेत सातत्याने नवनवीन अभ्यासपूरक उपक्रमांचे आयोजन करीत असतात.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता नुकतेच शाळेच्या वार्षिक महोत्सवाचे भव्य आयोजन नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियम श्री हव्याप्र मंडळ येथे करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमादरम्यान सागर व ओम जीरापुरे बंधूंचा शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार यांच्या हस्ते डॉ. गोविंद कासट, चंद्रकांत पोपट, दिलीप सदार, जीवन गोरे व प्राचार्य डॉ. सुभाष गवई लिखित तीन ते नऊ हे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांसह, शेकडो आजी-माजी विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.
दत्तूवाडी,आनंदनगर अमरावती येथील रहिवासी असलेले सागर व ओम नामदेवराव जीरापुरे यांचा मागील दोन वर्षांपासून डीजे साऊंडचा व्यवसाय आहे. अत्यंत प्रामाणिकपणे,माफक दरात शाळेला वार्षिक महोत्सवात उत्कृष्ट डीजे साऊंड व लाइटिंगची व्यवस्था देण्याकरिता या दोघेही बांधवांचा सन्मान यावेळी कार्यक्रमात करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीकरिता शाळेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
डीजे करिता लागणाऱ्या आकर्षक, सुंदर कॅबिनेट सागर स्वतः बनवितात व स्वतः ऑपरेट करतात. दोन टॉप पासून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली व दोन वर्षातच त्यांनी स्वतःचे नऊ सेटअप तयार केले आहेत. रोजगार नसलेल्या,पण या व्यवसायाची आवड असलेल्या गरजू व्यक्तींना यातील सात सेटअप त्यांनी वाजवी दरात देऊन त्यांना सुद्धा रोजगाराची एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे.अत्यंत चांगली व प्रामाणिक सेवा देत असल्यामुळे अमरावती व अमरावतीच्या बाहेर सुद्धा त्यांच्या डीजे साऊंडची मागणी आहे.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान पालक, विद्यार्थी, कर्मचारी वृंद यांच्यावर कुठलीही चिडचिड न करता यथोचित असे संपूर्ण सहकार्य त्यांनी शाळेला केले.
वार्षिक महोत्सवात प्रस्तुत होणारे कार्यक्रम, त्यांचा शाळा स्तरावर अपेक्षित असलेला दर्जा, विद्यार्थ्यांचे शिस्तीत कार्यक्रमांचे प्रस्तुतीकरण, शिक्षकांचा व पालकांचा कार्यक्रमाकरिताअसीम उत्साह या सर्व गोष्टींचे त्यांनी यावेळी विशेषतः मुख्याध्यापकांजवळ कौतुक केले.
या प्रसंगी मंचावर मुख्याध्यापक दिलीप सदार, सागर जीरापुरे, ओम जीरापुरे, विवेक सहस्त्रबुद्धे,मनोज कोरी, सचिन वंदे, सुजित खोजरे, ज्योती मडावी, मोनिका पाटील, आसावरी सोवळे, मनीषा श्रीराव, अश्विनी सावरकर, पल्लवी बिजवे,विलास देठे, अमोल पाचपोर,ईश्वर हेमणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.