प्रहार दिव्यांग क्रांतीचे मुर्दा आंदोलन

अकोला :- अकोल्यात आज प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने महत्त्वाचे आंदोलन करण्यात आले. दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कांसाठी महापालिका कार्यालयावर मुर्दा आंदोलन करत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. त्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत? आणि पुढे काय होणार? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट.
प्रहार दिव्यांग क्रांती संस्था, अकोला जिल्हा तर्फे विविध मागण्यांसाठी आज अकोला महानगरपालिका कार्यालयावर मुर्दा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात असंख्य दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. रेल्वे स्टेशन व बस स्टँड येथे दिव्यांग भवन, घरकुल, रोजगारासाठी स्टॉल, वार्षिक पेन्शन आणि बेरोजगार भत्ता वाढ या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
दिव्यांग बांधवांच्या या आंदोलनाकडे प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा city News.