मूल होण्याची इच्छा, गुप्तधनाची हाव आणि 11 बळी; 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घडलेले सर्वात क्रूर हत्याकांड

परभणी :- 90 चे दशक, काळी जादू, कर्मकांड, नरबळी यासारख्या घटना सुरूच होत्या. याच कर्मकांडातून महाराष्ट्र घडलं होतं भयंकर हत्याकांड. याच हत्याकांडावर अलीकडेच एक वेबसीरीजदेखील आली होती. या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली मात्र अजूनही या घटनेच्या थरारक आठवणी ताज्या आहेत.
मराठवाड्यातील परभणीतील मानवत या गावातून एकामागोमाग मुली, बायका गायब झाल्या आणि एकाएकी त्यांचे मृतदेह शेतात, विहिरीत सापडू लागले. तब्बल दोन वर्ष हा प्रकार सुरू होता. या अमानवी हत्याकांडाची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारने दखल घेत सीआयडीकडे तपास सोपवला. मानवत गावात तब्बल 11 महिलांचे खून करण्यात आले. त्याचे कारण म्हणजे गुप्तधन आणि मातृत्वाची इच्छा. इतकंच नव्हे तर या गुन्हातील संशयित आरोपी सहीसलामत सुटला गेला.
14 नोव्हेंबर 1972 रोजी 10 वर्षांच्या चिमुरडी गायब झाली मात्र दोन दिवस झाले तरी तिचा काही पत्ता लागला नाही. तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला. छिन्नविछिन्न अवस्थेत सापडलेला मृतदेह पाहून गावात एकच हाहाकार माजला. त्या दिवसांपासून गावात असे प्रकार घडले आहेत. पुन्हा तशाच पद्धतीने मृतदेह सापडला. एकामागोमाग मृतदेह सापडायला लागल्याने गावकरी धास्तावले. संध्याकाळी 7नंतर घराबाहेर पडायला कोणीही धजावत नव्हते.
क्रुर पद्धतीने तीन चिमुरडींची हत्या झाल्यानंतर यंत्रणेला खडबडून जाग आली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसांच्या तपासानंतर उत्तमराव बारहाते या व्यक्तीवर संशयाची सुई आली. उत्तमराव बारहाते हे मानवतमधील बडं प्रस्थ होतं. गावात त्यांची शेती व मोठा व्यापार होता. मोठा वाडादेखील होता त्यांचा.
उत्तमराव बारहाते हे रुक्मिणी या महिलेसोबत राहत होते. रुक्मिणी हातभट्टीचा व्यवसाय करत होती. उत्तमरावांनी रुक्मिणीसाठी वाडा घेतला होता. मानवतमध्ये घडलेल्या सातव्या हत्येनंतर जे समोर आले ते सर्वच भयंकर होते. नरबळी आणि गुप्तधनासाठी हे खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतर रुक्मिणी आणि उत्तमराव बऱ्हाटे यांना ताब्यात घेण्यात आले.
रुक्मिणी त्यावेळी 30 वर्षांची होती. रुक्मिणी कधीच आई बनू शकत नव्हती. तरीदेखील तिला मुलं हवे होतं. तर दुसरीकडे उत्तमरावाला गुप्तधनाची हाव होती. एका मांत्रिकाने त्याला सांगितले की पिंपळाच्या झाडाखाली गुप्तधन आहे तर त्याने ते सोनं मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला भाती होती ती मुंज्याची. पिंपळ्याच्या झाड्याखाली सोनं आहे आणि मुंजा त्यावर राहतो, अशी भिती मांत्रिकाने घातली.
हे गुप्तधन मिळवण्यासाठी मुलींची हत्या करण्यात आली. सुरुवातीला अल्पवयीन मुलींची हत्या करुन त्यांचा बळी देण्यात आला. मात्र, नंतर मांत्रिकाने गणपत साळवेने मासिक पाळी सुरू असलेल्या महिलांचा बळी देण्यास सांगितले. जुनाट वाड्यात पिंपळाचा मोठा वृक्ष आणि त्याच्या बुडाशी मुंजा आणि त्याला शेंदूर लावलेला होता. याच मुंज्याला बळी देण्याचा प्रकार सुरू झाला.
मानवतमधील हत्याकांडाचे पडसाद विधानसभेत उमटले. मुंबईहून वरिष्ठ पोलिस अधिकारी आहे. रमाकांत कुलकर्णी यांनी केस हातात घेतली. कोंडिबा रिळे नावाचा इसमाचा खून झाला. तेव्हा पोलिसांनी रुक्मिणी काळेची बहिण समिंद्रीला अटक केली आणि गूढ उकलण्यास सुरुवात झाली. समिंद्री माफीची साक्षीदार झाली आणि संपूर्ण प्रकरण समोर आले. उत्तमराव आणि रुक्मिणी यांच्यावर खटला सुरू झाला. कोर्टात केस उभी राहिली.
माफीच्या साक्षीदारांनी उत्तमराव आणि रुक्मणी यांनी पुत्रप्राप्ती आणि गुप्तधनासाठी हे खून करवून घेतल्याचे कबूल केले. जिल्हा सत्र न्यायालयाने दोघासह इतर गुन्हेगारांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण फाशीच्या शिक्षेविरुद्ध उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी उच्च न्यायालयात अपील केले. मात्र कोर्टाने दोघांनाही पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते.