एकनाथ शिंदेंनंतर भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी, पत्रात आक्षेपार्ह भाषा

बुलढाणा :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याची घटना ताजी असतानाच आता भाजपाच्या एका महिला आमदाराला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. यानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांना थेट पत्राच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हैराण करणारे म्हणजे श्वेता महाले यांच्या निवासस्थानी हे धमकीचे पत्र पाठवण्यात आलंय. श्वेता महाले या पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचेही माहिती मिळतंय.
आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी
आमदार श्वेता महाले यांना फक्त जीवे मारण्याची धमकीच नाही तर पत्रात अतिशय खालची भाषा देखील वापरली आहे. श्वेता महाले यांना हे पत्र कोणी पाठवले आणि त्यांच्या निवासस्थानापर्यंत हे कसे पोहोचले याबद्दल अधिक माहिती ही मिळू शकली नाहीये. धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांना बुलढाण्यातील देऊळगावच्या मही येथूनच धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. पोलिसांनी मही येथून दोन जणांना अटक केली.
श्वेता महाले करणार पोलिसात तक्रार दाखल
श्वेता महाले दुपारच्या वेळी आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत चिखली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर श्वेता महाले यांना धमकीचे पत्र आले. श्वेता महाले या दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपाकडून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात केली.
पत्रात वापरली आक्षेपार्ह भाषा
श्वेता महाले यांना धमकीचे पत्र आल्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून राजकिय सतत धमकीचे ईमेल आणि पत्र पाठवण्याच्या प्रकरणात मोठी वाढ झालीये. आता तर थेट राजकिय नेते मंडळींनाच धमकी मिळत आहे. श्वेता महाले यांच्या तक्रारीनंतर पोलिस तपासाला सुरूवात करतील. एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीनंतर आरोपींना अवघ्या काही तासांमध्ये पकडण्यात पोलिसांना यश आले.