LIVE STREAM

AmravatiEducation NewsLatest News

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ एक्केचाळिसावा दीक्षांत समारंभ पत्रकार परिषदेकरिता माहिती

अमरावती :- विद्यापीठाचा एक्केचाळिसावा दीक्षांत समारंभ रविवार, दि. 23 फेब्राुवारी, 2025 रोजी 11.00 वाजता विद्यापीठ परिसर, अमरावती येथे संपन्न होत आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा कुलपती श्री सी.पी. राधाकृष्णन भूषवतील. याप्रसंगी भारताचे सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्लीचे माननीय न्यायमूर्ती श्री भूषण रामकृष्ण गवई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते स्वागतपर भाषण व प्रास्तविक करतील. दीक्षांत समारंभाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय या कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सभासद तसेच सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता उपस्थित राहतील.

विद्यापीठ स्थापनेला 42 वर्ष पूर्ण होत आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि पदव्युत्तर शैक्षणिक विभागांच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना ज्ञानदानाचे कार्य निरंतरपणे सुरू आहे. 441 महाविद्यालये विद्यापीठाशी आजमितीस संलग्नित असून त्यातील 07 महाविद्यालये स्वायत्त आहेत. परीक्षांचे बदललेले स्वरूप, सेमिस्टर, वेळेवर निकाल यामुळे परीक्षा घेण्याचे कार्य कार्यक्षमतेने व गतीशील करण्याचा विद्यापीठाचा सातत्यपूर्ण प्रयत्न नेहमीच असतो.

उन्हाळी 2024 मध्ये 776 परीक्षांचे संचालन करण्यात आले, त्याला 2,90,227 परीक्षार्थी होते. त्यापैकी महाविद्यालयीन विद्याथ्र्यांची संख्या 1,56,702 तर माजी विद्याथ्र्यांची संख्या 1,35,325 इतकी होती. हिवाळी 2024 मध्ये 915 परीक्षा घेण्यात आल्यात, त्याला 2,84,063 परीक्षार्थी होते. उन्हाळी 2025 मध्ये अंदाजे 900 परीक्षांचे संचालन करण्यात येणार असून त्याला अंदाजे 3,15,000 परीक्षार्थी राहतील. त्यामध्ये महाविद्यालयीन 1,80,000 तर माजी 1,35,000 परीक्षार्थी राहतील.

दिवसेंदिवस विद्याथ्र्यांची संख्या वाढत आहे. तद्वतच अभ्यासक्रमांची संख्या वाढली आहे. नवीन राष्ट्रीय धोरण विद्यापीठाने लागू केले असल्यामुळे विविध कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम विद्याथ्र्यांना शिकविले जात आहेत. केवळ परीक्षा घेण्यापुरतेच विद्यापीठ काम करीत नाही, तर दर्जेदार अभ्यासक्रमासोबतच विहित मुदतीत निकाल सुद्धा लावल्या जातो. विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध संशोधन, साहित्यिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व ज्ञानवर्धक उपक्रमसुद्धा विद्यापीठाच्यावतीने राबविले जातात.

या दीक्षांत समारंभामध्ये 38,305 पदवीकांक्षींना व 238 विद्याथ्र्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे. विद्याशाखानिहाय पदवीकांक्षींची संख्या : मानव विज्ञान विद्याशाखा 8973, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 8109, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 14963 आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा 4123, या व्यतिरिक्त स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती 456, स्वायत्त शारीरिक शिक्षण महाविद्यालय (एच.व्ही.पी.एम.), अमरावती 991 व शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती 690 इतक्या पदवीकांक्षींना सुध्दा पदवी दिल्या जाणार आहेत.

संलग्नित महाविद्यालयांतील पात्र पदविकाधारकांची विद्याशाखानिहाय संख्या : मानव विज्ञान विद्याशाखा 17, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 51, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 19 आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा 151 अशी आहे.

या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ताप्राप्त विद्याथ्र्यांना 122 सुवर्णपदके, 22 रौप्यपदके व 24 रोख पारितोषिके असे एकूण 168 पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभामध्ये देण्यात येणा­या पदके/पारितोषिकांसाठी मुले व मुलींमध्ये सर्वाधिक जी.एस. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुर बाजार येथील कु. हर्षाली मधुकरराव हटवार या विद्यार्थीनीला सुवर्ण 06 व रोख पारितोषिक 01, प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा येथील कु. निकीता गोपाल देवचे या विद्यार्थीनीला सुवर्ण 06, तर लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ येथील कु. उत्कर्षा संजय वानरे या विद्यार्थीनीला सुवर्ण 04 , रौप्य 01 व रोख पारितोषिक 02 घोषित झाले आहेत. 89 विद्याथ्र्यांना पदके देवून गौरवान्वीत केले जाणार असून यामध्ये मुली 67, तर मुले 22 आहेत. यापैकी 02 सुवर्ण व 01 रोख पारितोषिक अशा 03 पदकांसाठी कोणीही पात्र ठरले नाहीत. वैशिष्ट¬े म्हणजे जास्तीतजास्त पदके प्राप्त करणा­यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. प्रथम तीनमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. ख­-याअर्थाने ही महिलोन्नोती आहे.

विद्यापीठांतर्गत शिक्षक व संशोधक विद्यार्थी संशोधनाचे कार्य करीत असून आजपर्यंत 5472 संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय 350 संशोधकांना आचार्य पदवी देवून सन्मानित करण्यात येत आहे.

आचार्य पदवी धारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत एकूण 146 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये रसायनशास्त्र विषयात 29, भौतिकशास्त्र 06, संगणक विज्ञान 05, प्राणिशास्त्र 10, गणित 14, परमाणू 04, सांख्यिकी 03, सूक्ष्मजीवशास्त्र 03, वनस्पतिशास्त्र 11, संगणकशास्त्र व अभियांत्रिकी 29, परमाणू अभियांत्रिकी 12, यांत्रिकी अभियांत्रिकी 02, विद्युत अभियांत्रिकी 06, स्थापत्य अभियांत्रिकी 02, माहिती व तंत्रज्ञान 01, रासायनिक तंत्रज्ञान 01, पर्यावरण विज्ञान 01, व भेषजी विज्ञान 07 आदींचा समावेश आहे.

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत एकूण 48 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये वाणिज्य विषयात 33, व्यवसाय अर्थशास्त्र 03 व व्यवसाय प्रबंधन 12 आदींचा समावेश आहे.
मानव विज्ञान विद्याशाखेत एकूण 118 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये इंग्रजी विषयात 31, मराठी 06, हिन्दी 05, राज्यशास्त्र 09, गृहअर्थशास्त्र 07, संगीत 07, मानसशास्त्र 03, अर्थशास्त्र 14, समाजशास्त्र 11, भूगोल 06, इतिहास 13 व विधी 06 आदींचा समावेश आहे.

आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत एकूण 38 आचार्य पदवीधारक असून त्यामध्ये शिक्षण विषयात 07, शारीरिक शिक्षण 16, ग्रंथालय व माहितीशास्त्र 12, समाजकार्य 02 व गृहविज्ञान 01 आदींचा समावेश आहे.

विद्यापीठाच्या एक्केचाळिसाव्या दीक्षांत समारंभामध्ये पदके व पारितोषिके प्राप्त करणा­या विद्याथ्र्यांनी सुरक्षितता लक्षात घेता सकाळी 8 वाजेपर्यंत दीक्षांत समारंभास्थळी उपस्थित रहावयाचे आहे. त्यांनी उपस्थित झाल्यानंतर सभामंडपातील वित्त विभाग व परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क साधावयाचा आहे.

दातृनामावलीची माहिती :-

1) डॉ. प्रशांत रा. मंडलीक, सचिव, एनसीसीटीसीएस-2022, 5 सी, जिजाऊ नगर, रहेमान लेआऊट, कॅम्प, अमरावती यांचेकडून Master of Science (Chemistry) परीक्षेत प्रथम येणा­या विद्याथ्र्यास ‘‘प्रा.डॉ. आनंद शंकरराव अस्वार सुवर्णपदक’’ स्थापित करण्याकरिता रू. 2,00,000/- (अक्षरी रूपये दोन लक्ष फक्त) इतका दाननिधी प्राप्त झालेला आहे.

2) डॉ.कु. कमल सिंग, नागपूर यांचेकडून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदार्थ विज्ञान विभागातून विज्ञान पारंगत (एम.एससी., पदार्थ विज्ञान) परीक्षेत प्रथम येणा­या विद्यार्थीनीस ‘‘डॉ.कु. कमल सिंग, प्रथम महिला कुलगुरू सुवर्णपदक’’ स्थापित करण्याकरिता रू. 2,00,000/- (अक्षरी रूपये दोन लक्ष फक्त) इतका दाननिधी प्राप्त झालेला आहे.

3) प्रा. गणेशराव उत्तमराव अविनाशे, अमरावती यांचेकडून शिक्षण पारंगत (एम.एड.) परीक्षेत प्रथम श्रेणीत प्रथम येणा­या विद्याथ्र्यास ‘‘प्रा.स्व. प्रतिभाताई गणेशराव अविनाशे स्मृती सुवर्णपदक’’ स्थापित करण्याकरिता रू. 2,00,000/- (अक्षरी रूपये दोन लक्ष फक्त) इतका दाननिधी प्राप्त झालेला आहे.

4) श्री नंदकुमार विष्णूपंत चौधरी, अमरावती यांचेकडून Master of Social Work परीक्षेत प्रथम येणा­या विद्याथ्र्यास ‘‘कै. विष्णूपंत यादवराव चौधरी सुवर्णपदक’’ स्थापित करण्याकरिता रू. 2,00,000/- (अक्षरी रूपये दोन लक्ष फक्त) इतका दाननिधी प्राप्त झालेला आहे.

दीक्षांत समारंभाचे वेबसाईटवर लाईव्ह प्रक्षेपण :-

एक्केचाळिसाव्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे विद्यापीठ युट¬ुब चॅनलवरुन सकाळी 11.00 ते कार्यक्रम संपेपर्यंत थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लाईव्ह बघण्याची सुविधा जगभरातील सर्व संबंधित विद्याथ्र्यांना व पालकांना उपलब्ध होणार आहे.

सभामंडपात डिजीटल स्क्रीन :-

सभामंडपात उपस्थित विद्यार्थी, पालक व अभ्यागतांना समारंभ व्यवस्थित बघता यावा, त्यासाठी मोठे डिजीटल स्क्रीन सभामंडपात लावले जाणार आहेत. त्यामुळे दर्शकांना जवळून समारंभ पाहता येईल.

आपण सर्व सन्माननीय पत्रकार आजच्या पत्रकार परिषदेला मोठ¬ा संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांना आपण सातत्याने व्यापक प्रसिद्धी दिली आहे. माझ्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळामध्ये विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण सर्वांचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले आहे. दीक्षांत समारंभाला आपण सर्वांनी मोठ¬ा संख्येने उपस्थित रहावे, यासाठी मी स्वत: आपल्याला आमंत्रित करतो आहे.
धन्यवाद !

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!